www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कॅन्प्स कॉर्नर भागातील माऊंट ब्लँक इमारतीची आग जरी विझली असली तरी आगीतनं आपल्या मागे मन हळवून सोडणारं दृश्य ठेवलंय. हे मॉक ड्रील असावं असा समज झाल्यानं रहिवाशांना घराबाहेर पडण्यास उशीर झाला, असंही आता समोर आलंय.
शुक्रवारी रात्री लागलेल्या या आगीत अजय सिंग यांचाही मृत्यु झालाय. वय वर्ष ३५ असलेले अजय सिंग हे गेल्या १० वर्षांपासून याच इमातीत सिक्युरिटी ऑफिसर म्हणून काम करत होते. रात्री साडेसातच्या सुमारास १२ व्या मजल्यावर आग लागल्याचं समजताच ते मदतीसाठी १२ व्या मजल्याच्या फ्लॅटमध्ये पोहोचले. त्यातच सिलेंडरचा स्फोट झाला. जीव वाचवण्यासाठी लिफ्टमार्गे त्यांनी खाली येण्याचा प्रयत्नही केला पण लिफ्ट बंद होती आणि गुदमरुन त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्या अशा अचानक मृत्युनं त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय.
या आगीत सात लोकांचा बळी गेलाय तर सात लोक जखमी झालेत. इमारतीत राहत असलेल्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीत अनेदा मॉक ड्रील अर्थात सुरक्षेसाठीच्या उपायजोनांची प्रात्यक्षिकासहित तपासणी झाली होती आणि त्यामुळे जेव्हा ही आग लागली तेव्हा लोकांना हे सुद्धा ‘मॉक ड्रील’ वाटलं... आणि त्यामुळेच लोकांना बाहेर पडायला जास्त उशीर झाला. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी मुंबई पोलिसांनी स्पेशल फॉरेंसिक टीमकडून याबाबत तपास करुन जर निष्काळजी पणामुळे आग लागली असेल तर दोषींवर योग्य कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय.
मुंबईत रोज उंचच उंच नवनव्या इमातरी उभ्या राहतायत. पण या इमारती किती सुरक्षित आहेत याबाबत ठोस उत्तर कोणाकडेच नाही. या अपघाताची तपासणी सुरु असली तरी भविष्यात अशी घडना टाळण्यासाठी सर्वांनीच दक्ष असण्याची गरज आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.