एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर

एमपीएससी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यात अभयसिंह मोहिते ४७० गुण मिळवून राज्यात सर्वप्रथम आला आहे.

Updated: Apr 5, 2015, 10:47 PM IST
एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर title=

मुंबई : २०१४ साली एमपीएससीने उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार या विविध पदांसाठी घेतलेल्या परिक्षेचा निकाल आयोगाने जाहीर केला असून उपजिल्हाधिकारीपदी ४४, तर पोलीस उपअधीक्षकपदी २४ जणांची निवड झाली आहे. गट अ आणि गट ब पदांसाठी घेण्यात आलेल्या या परिक्षेत ४३८ जण उत्तीर्ण झाले असून त्यापैकी १२५ जण अ वर्ग, तर ३१३ जण ब वर्ग पदांसाठी पात्र ठरले आहेत.

या निकालाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना पुण्यातील 'सिनर्जी स्टडी पॉईंट'चे संचालक अतुल लांडे म्हणाले की, गुणवत्तायादीत स्थान मिळवण्यासाठी अगदी मुलाखतीसहित प्रत्येक विषयात सरासरीच्या वर गुण मिळवणे क्रमप्राप्त आहे, हे या निकालाने सिद्ध केले आहे. तसेच, इंग्रजी व मराठीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. 

सामान्य अध्ययनसारख्या महत्वाच्या विषयात मागे पडलात, तर यश मिळणार नाही. यूपीएससीच्या अभ्यासाचा पाया असेल तर पद प्राप्त करणे अधिक सोपे जाते, ही बाब यंदाच्या निकालाने पुन्हा अधोरेखित केली आहे. तसेच, मागील वर्षीपेक्षा यंदा मुलींसाठीचे कट ऑफ मार्क्स वाढले आहेत. अधिकाधिक मुली स्पर्धापरीक्षांकडे आकृष्ट होणे ही आनंददायक बाब आहे. संस्थेचे ५०हून अधिक विद्यार्थी गुणवत्तायादीत झळकले आहेत.

एमपीएससीने पुढील पदांसाठी परीक्षा घेतली व यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या

गट अ
उपजिल्हाधिकारी – ४४
पोलीस उपअधीक्षक – २४
तहसीलदार- ३५
सहायक विक्रीकर आयुक्त – ६
उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ गटविकास अधिकारी – ९
सहायक संचालक, वित्त व लेखा विभाग – ७

गट ब
सेक्शन ऑफिसर – ५

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.