३ डॉक्टरांना दारू पिऊन गाडी चालविण्याप्रकरणी अटक

मुंबईतल्या जेजे रुग्णालयात काम करणाऱ्या तीन निवासी डॉक्टरांना दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. 

Updated: Oct 19, 2015, 10:55 AM IST
३ डॉक्टरांना दारू पिऊन गाडी चालविण्याप्रकरणी अटक  title=

मुंबई : मुंबईतल्या जेजे रुग्णालयात काम करणाऱ्या तीन निवासी डॉक्टरांना दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. 

राहुल जैन, शिव मेंहेंद्रू आणि वेद अशी या डॉक्टरांची नावं आहेत. रविवारी पहाटे सव्वा चार वाजता तिघांना नाकाबंदी दरम्यान दारू पिऊन गाडी चालवताना पकडण्यात आलं. 

कायदेशीर कारवाई दरम्यान या तिघांनी पोलिसांशी अभद्र शिवीगाळ केल्याचाही पोलिसांचा आरोप आहे. न्यायालयानं या तिघांना 1 दिवसाची पोलिस कोठडी सुनावलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.