मुंबई : वरिष्ठानं छेडछाड आणि शोषण केल्याचा आरोप मुंबई विमानतळावर काम करणाऱ्या एका महिला सुरक्षारक्षकानं केला आहे.
ही महिला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडची कर्मचारी असून ती सामान तपासणी विभागात सुरक्षारक्षक आहे. काम करताना वरिष्ठाकडून होणारी छेडछाड तसंच शारीरिक आणि मानसिक शोषणाची तक्रार तिनं कंपनीतील वरिष्ठ, एचआर आणि सीईओ यांच्याकडे केली होती.
मात्र कंपनीनं या पीडित महिलेला त्या विभागातून काढून दुसऱ्या विभागात नियुक्ती केली. तिला तिचं एक्सेस कार्डही देण्यात आलेलं नाही. या सगळ्या प्रकाराची पीडित महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अद्याप याप्रकरणी कुणालाही अटक केलेली नाही..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.