मुंबईतदेखील मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी वाहतूक रोखली

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातल्या वाहनाची धडक बसल्यामुळं एका तरुणाचा मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात मुंबईतदेखील मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी वाहतूक रोखून धरण्यात आली होती. त्यामुळं व्हीआयपी कल्चरविरोधात सध्या जनतेतून रोष व्यक्त होतोय.

Updated: Mar 3, 2015, 07:24 PM IST
मुंबईतदेखील मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी वाहतूक रोखली title=

मुंबई : हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातल्या वाहनाची धडक बसल्यामुळं एका तरुणाचा मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात मुंबईतदेखील मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी वाहतूक रोखून धरण्यात आली होती. त्यामुळं व्हीआयपी कल्चरविरोधात सध्या जनतेतून रोष व्यक्त होतोय.
 
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांच्या ताफ्यातल्या वाहनाची धडक बसल्यामुळं एका तरुणाचा मृत्यू झालाय. यामुळं पुन्हा एकदा व्हीआयपी कल्चरचा मुद्दा चर्चेत आलाय. खट्टर चंदीगडहून दिल्लीला निघाले असताना कर्नालमधल्या तराओरीजवळ सोमवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. त्यात सत्पाल नावाच्या भाजीविक्रेत्याचा मृत्यु झालाय. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातल्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. 

याच व्हीआयपी कल्चरचा फटका गेल्या आठवड्यात मुंबईकरांनाही बसला होता. वरळीतल्या एका कार्यक्रमासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी वाहतूक थांबवून ठेवण्यात आली होती. यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलगिरीदेखील व्यक्त केली होती. व्हीआयपी कल्चरमुळं होणा-या त्रासाला सामान्य नागरिकदेखील वैतागले आहेत. मात्र वर्षानुवर्षं सवयीचं झालेलं हे कल्चर राजकीय नेते सहजासहजी अंगावेगळं करू शकतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.