आरे कॉलनीत पाच वर्षीय चिमुरडीवर बलात्कार

एका पाच वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करण्याची घटना घडलीय. सोमवारी गोरेगावच्या आरे कॉलनीमध्ये घडली. या मुलीचं अंधेरीच्या सहार परिसरातून अपहरण केलं होतं. या प्रकरणी आरे पोलिसांनी अनोळखी रिक्षाचालकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, हे प्रकरण सहार पोलिसांकडे वर्ग केलं आहे.

Updated: Mar 3, 2015, 04:33 PM IST
आरे कॉलनीत पाच वर्षीय चिमुरडीवर बलात्कार title=

मुंबई: एका पाच वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करण्याची घटना घडलीय. सोमवारी गोरेगावच्या आरे कॉलनीमध्ये घडली. या मुलीचं अंधेरीच्या सहार परिसरातून अपहरण केलं होतं. या प्रकरणी आरे पोलिसांनी अनोळखी रिक्षाचालकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, हे प्रकरण सहार पोलिसांकडे वर्ग केलं आहे.

श्रूती (बदललेलं नाव) ही मुलगी सहार परिसरात कुटुंबियांसोबत राहते. रविवारी सायंकाळी तिच्या आईनं तिला दुकानातून दूध आणण्यासाठी पाठवलं होतं. मात्र बराच वेळ झाला तरी श्रूती घरी परतली नाही. म्हणून तिच्या घरच्यांनी तिचा शोध सुरू केला. मात्र श्रूती कुठेच सापडली नाही. अखेर ती हरवल्याची तक्रार तिच्या घरच्यांनी सहार पोलीस ठाण्यात नोंदवली. 

दरम्यान, क्राइम ब्रँच कक्ष ९चे पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश वंझारे हे घाटकोपरहून दुचाकीवरून त्यांच्या घरी परतत होते. त्यावेळी त्यांना रडण्याचा आवाज आला. त्यांनी गाडी थांबवून पाहिलं, तेव्हा त्यांना श्रूती दिसली. त्यांनी विश्वासात घेऊन श्रूतीकडून माहिती घेतली. तेव्हा रिक्षावाल्या काकांनी मला इथं सोडल्याचं तिनं सांगितलं. तिच्यासोबत काही तरी गैरकृत्य घडल्याचा अंदाज वंझारे यांना आला. 

क्षणाचाही विलंब न करता वाघमारे यांनी श्रूतीला सोबत घेत रिक्षाचा शोध सुरू केला. त्यांनी आरे मार्गावरील तीन-चार रिक्षावाल्यांना थांबवून श्रूतीला त्यांना ओळखण्यास सांगितलं. मात्र त्यापैकी कोणीही नसल्याचं श्रूतीनं सांगितलं. अखेर वंझारेंनी तिला आरे पोलिसांच्या स्वाधीन केलं आणि पोलीस नियंत्रण कक्षावर हरवलेली मुलगी सापडल्याची माहिती दिली.  

कूपरमध्ये तपासणी

श्रूतीची स्थिती फारच गंभीर असल्यानं आरे पोलिसांनी तिला वैद्यकीय चाचणीस कूपर रुग्णालयात पाठविलं. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना कळविण्यात आलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.