मुंबई हल्ल्याचा होणार उलगडा, जगासमोर येणार इत्यंभूत माहिती

26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी डेव्हिड कोलमन हेडली माफीचा साक्षीदार झाल्याने पाकिस्तानचा खऱा चेहरा उघड होणार आहेत. या हल्ल्याचं षडयंत्र कोणी रचलं. त्यासाठी पैसा आणि शस्त्र कोणी पुरवली आणि तो कोणी घडवून आणला हे सगळं काही उघड होणार आहे. 

Updated: Dec 12, 2015, 04:44 PM IST
मुंबई हल्ल्याचा होणार उलगडा, जगासमोर येणार इत्यंभूत माहिती title=

मुंबई : 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी डेव्हिड कोलमन हेडली माफीचा साक्षीदार झाल्याने पाकिस्तानचा खऱा चेहरा उघड होणार आहेत. या हल्ल्याचं षडयंत्र कोणी रचलं. त्यासाठी पैसा आणि शस्त्र कोणी पुरवली आणि तो कोणी घडवून आणला हे सगळं काही उघड होणार आहे. 

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटाची इत्यंभूत माहिती जगासमोर येणार असून पाकिस्तान आणि आयएसआयचं पितळ उघड पडणआर आहे..कारण मुंबई हल्ल्यातील एक प्रमुख आरोप डेव्हिड कोलमन हेडली माफीचा साक्षिदार बनला आहे.. हा हल्ला कोणी ? आणि कसा केला ? त्याचं षडयंत्र कोणी रचलं होतं? हे सगळं काही उघ़ड होणार आहे. अमेरिकेच्या ताब्यात असलेला हे़डली भारतीय कोर्टाला  ही सगळी माहिती देणार आहे.

मुंबई सत्र न्यायालयात सुरु असलेल्या २६/११ च्या खटल्यात हेडली ४ अटींवर माफीचा साक्षीदार बनला आहे. जकीउर रेहमान लखवी , अबू जुंदाल आणि डेव्हिड हेडली हे तिघेजण 26/11च्या हल्ल्याचे मुख्य सूत्रधार असल्याचं तपासात उघड झाल आहे.आता हेडली माफिचा साक्षिदार झाल्यामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर येणार आहे.तसेच या हल्ल्यात आणखी कोणाचा सहभाग होता का ? ते ही उघड होणार आहे.

भारताने अमेरिकेकडं  डेव्हिड हेडलीला  भारताच्या ताब्यात देण्याची मागणी केली होती.  तो अमेरीकन नागरीक असल्याने आणि त्याने स्वत: गुन्हे कबुल केल्याने अमेरिकेनं हेडलीला भारताच्या स्वाधीन करण्यास नाकार दिला.
 मात्र भारत सरकारच्या पाठपुराव्यामुळे त्याची व्हिडिओ कॉन्फर्न्सिंग द्वारे साक्ष घेणे शक्य झाले. हेडलीच्या साक्षीचा फायदा या खटल्यासाठी होणार आहे.
 
26/11च्या खटल्यात कोणता फायदा होणार ?
- 26/11च्या  दहशतवादी हल्ल्याचे खरे कारण समोर येणार
- दहशतवादी हल्ल्यातील पाकिस्तानचा सहभाग पुन्हा एकदा उघड होणार 
- जकीउर रेहमान लखवीचे पाकिस्तान सरकार, आयएसआय आणि लष्कर ए तैय्यबाशी असेले संबंध उघड होणार 
- हल्ल्याचे षडयंत्र  कसे रचले ? त्यासाठी पैसा आणि  इतर मदत कोणी केली हे जगासमोर येणार 
- या दहशतवादी हल्ल्यातील  फरार आणि संशयीत आरोपींची माहिती मिळणार 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.