मध्य रेल्वेची वाहतूक धीम्यागतीनं सुरु

मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते दिवा दरम्यान सुरू असलेला मेगाब्लॉक अखेर हटवण्यात आलाय. त्यामुळं फास्ट ट्रॅकवरून लोकल सोडण्यात आल्या आहेत. ठाणे ते कळवा दरम्यान पारसिक बोगद्याजवळील संरक्षण भिंतीला तडे गेल्यामुळं रेल्वे प्रशासनानं ती पूर्णपणे हटवली आहे. हे काम सुरू असल्यामुळं काही तास मध्ये रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू होती. तर फास्ट ट्रकवरील वाहतूक पूर्णपणे बंद कऱण्यात आली होती. त्यामुळं मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले. 

Updated: Jun 21, 2016, 06:30 PM IST
मध्य रेल्वेची वाहतूक धीम्यागतीनं सुरु title=

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते दिवा दरम्यान सुरू असलेला मेगाब्लॉक अखेर हटवण्यात आलाय. त्यामुळं फास्ट ट्रॅकवरून लोकल सोडण्यात आल्या आहेत. ठाणे ते कळवा दरम्यान पारसिक बोगद्याजवळील संरक्षण भिंतीला तडे गेल्यामुळं रेल्वे प्रशासनानं ती पूर्णपणे हटवली आहे. हे काम सुरू असल्यामुळं काही तास मध्ये रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू होती. तर फास्ट ट्रकवरील वाहतूक पूर्णपणे बंद कऱण्यात आली होती. त्यामुळं मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले. 

ठाणे महानगरपालिकेनं पारसिक बोगद्यावर असलेल्या संरक्षक भिंती बाबत रेल्वेला अलर्ट दिला होता. तसंच कल्याणकडून ठाण्याकडे येताना काळजी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. बोगद्याजवळ ट्रेन काळजीपूर्वक नेण्याचे आदेश मध्यरेल्वेनं मोटरमनना दिले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून बोगद्याजवळ वाहतूकीची गती संथ करण्यात आली होती. तर पारसिक बोगद्यात सेफ्टी मॅट लावण्यात येणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.