पुन्हा 'मरे'चे रडगाणे, रेल्वे रुळाला तडा गेल्यानं वाहतूक विस्कळीत

कुर्ला-विद्याविहारदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. याचा परिणाम ठाण्याहून सीएसटीच्या दिशेनं येणाऱ्या अप मार्गावरील गाड्यांवर झाला आहे. 

Updated: Jul 15, 2015, 09:21 AM IST
पुन्हा 'मरे'चे रडगाणे, रेल्वे रुळाला तडा गेल्यानं वाहतूक विस्कळीत title=

मुंबई: कुर्ला-विद्याविहारदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. याचा परिणाम ठाण्याहून सीएसटीच्या दिशेनं येणाऱ्या अप मार्गावरील गाड्यांवर झाला आहे. 

त्यामुळं मुलुंड ते माटुंगा दरम्यान फास्ट ट्रॅकवरील गाड्या स्लो ट्रॅकवर वळवण्यात आल्या असून मध्य रेल्वेची एकूणच वाहतूक कोलमडली आहे.

आज सकाळी ऐन गर्दीच्या वेळेस रेल्वे रुळाला तडे गेल्याचं लक्षात आलं, त्यामुळं वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालीय. ऐन गर्दीच्या वेळेस मध्य रेल्वेवरील गाडयांच्या या गोंधळांमुळं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.