मुस्लीम असल्याने कंपनीने नोकरी नाकारली

 एका कंपनीने युवकाचा धर्म मुस्लिम असल्याने त्याला नोकरी नाकारली आहे, विशेष म्हणजे एका मेलने या कंपनीने या तरूणाला तसे उत्तरही दिले आहे.

Updated: May 21, 2015, 08:27 PM IST
मुस्लीम असल्याने कंपनीने नोकरी नाकारली title=

मुंबई :  एका कंपनीने युवकाचा धर्म मुस्लिम असल्याने त्याला नोकरी नाकारली आहे, विशेष म्हणजे एका मेलने या कंपनीने या तरूणाला तसे उत्तरही दिले आहे.

मुंबईतील कुर्ल्यात राहणारा झिशान अली खान एमबीए झाला आहे, त्याने 'हरी कृष्णा एक्सपोर्ट्स' या कंपनीत १९ मे रोजी नोकरीसाठी अर्ज केला.

यानंतर झिशानला अवघ्या १५  मिनिटांत कंपनीचं उत्तर आलं. कंपनीने उत्तरात म्हटलं होतं,  'तुम्ही नोकरीसाठी अर्ज केला, आम्हाला आनंद आहे. मात्र आम्ही तुम्हाला नोकरी देऊ शकत नाही. कारण आमची कंपनी फक्त गैर मुसलमान व्यक्तीनाच नोकरी देते.'

झिशानने यावर नाराजी व्यक्त करतांन सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीपूर्वी 'सबका साथ सबका विकास'च्या गोष्टी करत होते.

युवकांना नोकरी देण्याच्या गोष्टी करत होते. मात्र एखादी कंपनी धर्मावरून भेदभाव करत असेल, तर देशाचा विकास कसा होणार. मात्र कंपनीच्या मेल व्यतिरिक्त कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.