मुंबई : भांडुपच्या प्रभाग क्रमांक 116 च्या कॉंग्रेस नगरसेविका प्रमिला पाटील यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
फेब्रुवारीमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या प्रमिला पाटील यांनी विजय मिळविला आहे. काँग्रेसच्या ३१ नगरसेवकांपैकी प्रमिला पाटील या होत्या.
दिना बामा पाटील यांची सून असून काँग्रेस नेते संजय दिना पाटील यांच्या वहिनी आहेत.