भरधाव कारनं पाच जणांना चिरडलं

मुंबईत भरधाव कारने पाच जणांना चिरडलंय. अंधेरीमध्ये हा अपघात घडलाय. यातील पाचही जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 22, 2013, 08:25 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत भरधाव कारने पाच जणांना चिरडलंय. अंधेरीमध्ये हा अपघात घडलाय. यातील पाचही जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
या अपघातात दोन महिला आणि एका चिमुरड्याचाही समावेश आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते ड्रायव्हर दारूच्या नशेत गाडी चालवत होता. आणि घटनेच्या वेळी गाडीचा वेगही प्रचंड होता. पोलिसांनी ड्रायव्हरला ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरू आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.