अमित जोशी, झी मीडिया, मुंबई: मुंबईचे 5 एन्ट्री पॉईन्ट्सचे टोल बंद करण्याबाबतचा रिपोर्ट पूर्ण झालेला नाही. हा अहवाल देण्याची मुदत 3 महिन्यांनी वाढवण्यात आलीय.
ऑक्टोबर अखेरपर्यंत हा अहवाल येणार आहे. त्यानंतरच मुंबई एन्ट्री पॉईन्ट टोल बंद करता येण्याबाबत निर्णय घेता येणार आहे.
लहान वाहनांना सूट देण्याबाबत विचार सुरू आहे. मात्र लहान वाहनं जवळपास 70 टक्के आहेत. सरसकट टोल बंद करण्यासाठी सुमारे 2000 कोटी लागणार आहेत. 53 टोल नाके बंद करण्याएवढी ही रक्कम आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.