मुंबई : मुंबई महापालिकेत सर्वाधिक पगार कुणाचा असा प्रश्न विचारल्यावर साहजिकच उत्तर असेल पालिकेचे आयुक्त अजोय मेहेता...पण जरा थांबा...हे उत्तर चुकींचं आहे.
मुंबई महापालिकेत एक अजब प्रकार घडलाय. पालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांचा पगार आयुक्तांपेक्षा जास्त असल्याचं पुढे आलंय. झी मीडियाचं सहकारी वृत्तपत्र डीएनएच्या हाती लागलेल्या पगाराच्या स्लीपनुसार पालिकेचे जनसंपर्क अधिकारी राम दुतोंडे यांना दरमहा 1 लाख 48 हजार रुपये आहे.
शिवाय दुतोंडेंना दक्षिण मुंबईत पालिकेचं मोफत घर आणि चालकासह पालिकेची गाडीही मिळालीय. त्यामुळे दुतोंडे हे पालिकेतले सर्वाधिक पगार घेणारे अधिकारी बनले आहेत. राम दुतोंडेंवर होणारा पालिकेचा एकूण खर्च दोन लाखांच्या घरात आहे. आयुक्तांवर सध्या मुंबई पालिकेच्या तिजोरीतून दीड लाख रुपये खर्च केला जातोय. गेल्या जून महिन्यात मेहता आयुक्तपदी आल्यावर दुतोंडेंची विशेष नियुक्ती करण्यात आलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.