मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची उलथापालथ

मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भातील बातम्या थोडक्यात... 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 2, 2017, 11:02 PM IST
मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची उलथापालथ title=

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भातील बातम्या थोडक्यात... 

 

नाराज माधुरी मांजरेकर मातोश्रीवर 

 
 शिवसेना वडाळा वॉर्ड क्रमांक 178 मधील इच्छुक मात्र उमेदवारी न मिळाल्यानं नाराज असलेल्या माधुरी मांजरेकरांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली. युवा सेनेचे अमेय घोले यांच्या उमेदवारीला विरोध होतोय. यावेळी  त्यांनी न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला. 
 

काँग्रेसचे कृष्णा हेगडे भाजपमध्ये 

 
कृष्णा हेगडे यांची मुंबई भाजपाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलीय. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी आमदार कृष्णा हेगडे यांची भाजपचे मुंबई शहर उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली गेली. 

राष्ट्रवादीतून सेनेत आलेल्या भोईर कुटुंबियांनी भरला अर्ज 

ठाण्यात राष्ट्रवादीकडून सेनेत दाखल झालेले राष्ट्रवादीचे नेते देवराम भोईर यांच्यासह त्यांचे पुत्र संजय भोईर आणि त्यांच्या पत्नी उषा भोईर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. माजी अपक्ष उमेदवार रवी पाटील यांच्या पत्नी निशा पाटील यांनी सेनच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. मोठा गाजावाजा करत तसंच शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात आले. 

मुलुंडमध्ये सेनेची खेळी 

मुलुंडमध्ये पालिका निवडणुकीत शिवसेना भाजपा असा संघर्ष रंगणार आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मुलुंडमध्ये शिवसेनेनं शक्तीप्रदर्शन करत आपल्या उमेदवारांचे अर्ज भरले. यावेळी गुजराती वोट काबीज करण्यासाठी शिवसेनेने वार्ड क्रमांक 108 मधून उमेश कारिया यांना उमेदवारी दिलीय. तर भाजपाकडून या वॉर्डमधून किरीट सोमय्यांचा मुलगा निलला उमेदवारी मिळालीय.