गळक्या मेट्रोमध्ये भिजते रविना टंडन

 अनेक वर्षांपासून मुंबईकर ज्या मेट्रोची वाट पाहत होते, ती गेल्या महिन्यात धुमधडाक्यात सुरू झाली मेट्रो पहिल्या पावसात गळायला लागली. या मेट्रो गळतीची सोशल मीडियावर चांगलीच टर उडवली आहे.

Updated: Jul 4, 2014, 06:57 PM IST
गळक्या मेट्रोमध्ये भिजते रविना टंडन title=
सौजन्य - फेसबुक

मुंबई :  अनेक वर्षांपासून मुंबईकर ज्या मेट्रोची वाट पाहत होते, ती गेल्या महिन्यात धुमधडाक्यात सुरू झाली मेट्रो पहिल्या पावसात गळायला लागली. या मेट्रो गळतीची सोशल मीडियावर चांगलीच टर उडवली आहे.

सोशल मीडियावर नेटिझन्सने मुंबई मेट्रोच्या 'शॉवर'खाली आंघोळ करतानाची चित्रे पोस्ट केली. तर कुणी मेट्रोचा मार्ग 'वॉटर किंग्डम'च्या दिशेने नेला. काही कल्पक नेटकरी मंडळीनी तर रवीना टंडनला मुंबई मेट्रोमध्येच ‘टीप टीप बरसा पानी’ या मोहरा चित्रपटाच्या गाण्यावर 'रेन डान्स' करायला लावले. एकूणच बुधवारी मुंबई मेट्रोला गळती लागल्याचे आणि नव्या को-या डब्यात पावसाचे पाणी आल्याने नेटक-यांनी सोशल मीडियावर मुंबई मेट्रोला 'धुऊन' काढले.

दरम्यान, मुंबई मेट्रोच्या डब्यात महिन्याभरातच गळती होऊ लागल्यानंतर याचे सामाजिक व राजकीय पडसाद उमटताच राज्य सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. विविध स्तरातून मुंबई मेट्रोबाबत टीका होऊ लागल्याने या प्रकरणाची मुख्यमंत्री कार्यालयाने रियालन्सकडे याची विचारणा करणार आहे. यामुळे हे मुंबई मेट्रो गळती प्रकरण मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडच्या रिलायन्स इन्फ्राला म्हणजेच अनिल अंबानींना चांगलेच भारी पडणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.