मुंबई : मुंबईतून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवास महागला आहे. मेट्रो तीनच्या उभारणीसाठी विमान प्रवाशांवर विशेष कर लावण्यात आलाय. तर विमानतळासाठी दोन विशेष मेट्रो स्टेशन्स असणार आहेत.
मुंबईमधून विमान प्रवास आता काहीसा महाग होणार आहे. मुंबईमधून विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर मेट्रो -३ च्या निर्माण कार्यासाठी विशेष लेव्ही आकारली जाणार आहे. देशांतर्गत विमानाच्या तिकीटांवर १२० रूपये तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी ७२० रूपये लेव्ही आकारली जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि देशांतर्गत विमानतळांसाठी या मेट्रो ३ प्रकल्पात प्रत्येकी एक मेट्रो स्टेशन असणार आहे. त्यासाठी हा निधी उभारला जाणार आहे.