मुंबई : मुंबईत सेल्फी काढण्यावर आता निर्बंध असणार आहेत. तसे फलक पंधरा ठिकाणी लावण्याचे निर्देश पोलिसांनी काढलेत. त्यानुसार पालिका बंदी फलक लावणार आहे.
गेल्या आठवड्यात वांद्रे बँडस्टँड परिसरात सेल्फी काढण्याच्या नादात दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी मुंबईतल्या पंधरा ठिकाणी सेल्फी काढण्यात बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. येत्या काही दिवसात मुंबई महापालिकेकडून बंदी घालणारे फलक लावले जाणार आहेत.
त्याचप्रमाणे नियमाचं पालन व्हावं यासाठी सुट्टीच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस कर्मचारीही नेमण्यात येणार आहे. यात मरिन लाईन्स, गिरगाव चौपाटी, वांद्रे बँडस्टँड, सायनचा किल्ला ,वरळीचा किल्ला, माहिमचा किल्ला, ससून डॉक या ठिकाणांचा समावेश आहे.