मुंबई : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच न्हावा शेवा ते शिवडी या २२ किलोमीटर लांबीच्या सागरी सेतूला सीआरझेडची परवानगी मिळाली आहे.
अधिक वाचा : मुंबईतील कोस्टल रोडला केंद्राचा हिरवा कंदिल
केंद्र सरकारनं ही परवानगी दिल्याने या प्रकल्पातला मोठा अडथळा दूर झालाय. दरम्यान, उद्या केंद्रीय वन विभागाची बैठक होणार आहे. त्या बैठकीत वन विभागाच्या परवानगीचा अडथळाही दूर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुंबईतल्या कोस्टल रोडला अखेर केंद्र सरकारनं हिरवा कंदिल दिलाय. कोस्टल रोड बांधण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्व परवानग्या मिळाल्यात, असं ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.