मुंबई : मुंबईतल्या कोस्टल रोडला अखेर केंद्र सरकारनं हिरवा कंदिल दिलाय.
कोस्टल रोड बांधण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्व परवानग्या मिळाल्यात, असं ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
पंतप्रधान मोदी आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांचे त्यांनी खास आभार मानलेत. नरिमन पॉईंट ते चारकोप असा हा प्रस्तावित कोस्टल रोड असून, मुंबईकरांचं स्वप्न साकार होईल, असे मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
Thank you @narendramodi ji& @PrakashJavdekar ji for issuing notification allowingCoastalRoad construction.Its dream come true for Mumbaikars
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 30, 2015