पेंग्विन दर्शनासाठी मुंबईकरांची मोठी गर्दी

भायखळाच्या जिजामाता उद्यानातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पेंग्विन कक्ष शनिवारपासून सामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आलाय. त्यानंतर पेंग्विनच्या दर्शनासाठी मुंबईकर राणीच्या बागेत मोठी गर्दी करतायत. 

Updated: Mar 19, 2017, 05:49 PM IST
पेंग्विन दर्शनासाठी मुंबईकरांची मोठी गर्दी title=

मुंबई : भायखळाच्या जिजामाता उद्यानातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पेंग्विन कक्ष शनिवारपासून सामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आलाय. त्यानंतर पेंग्विनच्या दर्शनासाठी मुंबईकर राणीच्या बागेत मोठी गर्दी करतायत. 

राणीच्या बागेत पेंग्विन कक्षावरुन भाजप आणि शिवसेना यांच्यात चांगलच रणकंदन माजलं होतं. शुक्रवारी  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसंच युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पेग्विन कक्षाचा लोकार्पण सोहळा पार पडला होता. 

मात्र या सोहळ्यावर भाजपने बहिष्कार टाकला होता. जिजामाता उद्यानात इतर प्राणी-पक्ष्यांनाही आणून उद्यानाचा विकास केला असता, तर तशा लोकार्पण कार्यक्रमाला गेलो असतो असा उपरोधिक टोला भाजपचे मुंबई महानगरपालिका गटनेते मनोज कोटक यांनी लगावलाय.