www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शऱद पवार आणि भाजप नेते गोपिनाथ मुंडे यांच्यात सामना रंगणार आहे. गोपीनाथ मुंडे यांनी एमसीएच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलाय. तर शरद पवारही शुक्रवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यामुळं मुंडे आणि पवारांमध्ये सरळ लढत रंगण्याची शक्यता आहे. एमसीएच्या निव़डणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ११ ऑक्टोबर आहे.
बीसीसीआयशी संलग्न असलेली एमसीए ही एक खाजगी क्रिकेट संघटना आहे. तरीही या संस्थेची निवडणूक ही लोकसभा आणि विधानसभेएवढीच रंगतदार ठरते. राजकारणाव्यतिरिक्त ज्या निडणुकीची चांगलीच चर्चा रंगते ती एमसीएची निवडणूक नक्की कशी होते आणि कशाप्रकारे 17 सदस्यीय कार्यकारिणी निवडून येते?
मुंबई क्रिकेट एसोसिएशची निवडणूक ही नेहमीच रंगतदार ठरते आणि ही निवडणूक नेहमीच सा-यांच्या चर्चेचा विषय ठरते. राजकारण्यांनाही या निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतल्याशिवाय राहवत नाही. विधानसभा आणि लोकसभेत आकड्यांची समीकरण जुळवत सत्तेची चव चाखणा-या पट्टीच्या राजकारण्यांना एमसीएमध्येही आकड्यांच गणित जुळवावंच लागत.
एमसीएमच्या अंतर्गत एकूण 367 क्बल्स आहेत. मात्र, यातील 38 एसोसिएट्स क्लब्सना मतदानाचा अधिकारच नाहीच. 367 पैकी 329 क्लब्सनाच मतदानाचा अधिकार आहे. 329 क्लब्सपैकी 211 हे मैदानी क्लब्स आहेत. तर 81 ऑफिस क्लब्स आणि 37 कॉलेज आणि शालेय क्लब्सचा समावेश आहे. अशी एकूण 329 क्बल्स एमसीएची कार्यकारिणी निवडतात.
एमसीएची कार्यकारिणी ही 17 सदस्यांची असते. यातील एक अध्यक्ष, 2 उपाध्यक्ष, 2 सचिव, 1 खजिनदार आणि 11 व्यवस्थापकीय समितीचे सदस्य असतात.
17 पैकी प्रत्येक सदस्याला सर्वच्या सर्व 329 क्लब्सकडून प्रत्येकी एक प्रतिनिधी मतदान करतो. यातील ज्या उमेदवाराला बहुमत मिळते तो उमेदवार विजयी म्हणून घोषित करण्यात येतो.
एमसीएमध्ये सध्यस्थितीला जवळपास 15 मतदार हे कोणत्या ना कोणत्या तरी राजकीय पक्षाचे नेते आहेत. क्लब्सचे सदस्य असलेले अनेक राजकीय नेतेही हे एमसीए निवडणुकीत लढवण्यास नेहमीच इच्छुक असतात. सध्या 2001 ते 2011 अशी जवळपास 10 वर्ष एमसीची सत्ता उपभोगलेल्या शरद पवार पुन्हा एकदा एमसीएच्या अध्यक्षपदी आरूढ होण्यासाठी इच्छुक आहेत. मुंडेंनी आधी फॉर्म भरून आपण त्यांच्या विरोधात नाही, तर तेच आपल्या विरोधात आहेत असं दाखवून दिलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.