मतदार यादीत घोळ, शिवसेना घेणार न्यायालयात धाव

मुंबई महापालिका निवडणुकीवेळी मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला होता. याबाबत शिवसेना न्यायालयात धाव घेणारय. 

Updated: Feb 26, 2017, 09:23 AM IST
मतदार यादीत घोळ, शिवसेना घेणार न्यायालयात धाव title=

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीवेळी मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला होता. याबाबत शिवसेना न्यायालयात धाव घेणारय. 

सुमारे 12 लाख मतदारांची यादीतून नावं गायब झालीयत. दक्षिण मध्य मुंबई आणि पूर्व पश्चिम उपनगरात या घटना मोठ्या प्रमाणात समोर आल्यायत. 

यामुळे नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही, शिवाय मनस्ताप झाला तो वेगळाच याचविरोधात आता शिवसेना दाद मागणारय. 

21 फेब्रुवारी रोजी मुंबई महापालिकेसाठी मतदान पार पडलं होतं. तर 23 फेब्रुवारील पालिका निवडणुकीचा निकार जाहीर झाला.