शिवसेनेला मोठा झटका, नाना आंबोले भाजपमध्ये

शिवसेनेला मुंबई महापालिकेच्या तोंडावर मोठा झटका बसला आहे. लालबाग-परळ परिसरातले प्रसिद्ध नगरसेवक नाना आंबोले भाजपच्या वाटेवर आहेत.

Updated: Feb 2, 2017, 01:09 PM IST
शिवसेनेला मोठा झटका, नाना आंबोले भाजपमध्ये  title=

मुंबई : शिवसेनेला मुंबई महापालिकेच्या तोंडावर मोठा झटका बसला आहे. लालबाग-परळ परिसरातले प्रसिद्ध नगरसेवक नाना आंबोले भाजपच्या वाटेवर आहेत. आंबोले यांनी मुंबई महापालिकेच्या अनेक महत्वाच्या पदांवर काम केलं आहे.

गेली दोन टर्म नाना आंबोले नगरसेवक म्हणून काम करत आहेत. बेस्ट समितीच्या अध्यक्षपदावरून हटवल्यापासून आंबोले नाराज होते. तेव्हापासून त्यांना कुठलही पद देण्यात आलेलं नव्हतं.