मुंबई : नारायण राणे समर्थकांकडून एका सामान्य माणसाला मारहाण झाल्याचं समोर आलं आहे. वांद्रे पोटनिवडणुकीत नाराणय राणे पराभवाच्या छायेत असतांना, शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या घरासमोर फटाकेफोडून जल्लोष केला.
या दरम्यान काही वेळाने राणे समर्थकांचीही त्या ठिकाणी गर्दी झाली, मात्र नारायण राणेंच्या घराजवळ एटीएम मशीनमध्ये पैसे काढण्यासाठी एक व्यक्ती आला, तो शिवसैनिक असल्याचं नारायण राणे समर्थकांना वाटलं, यावरून त्या व्यक्तीला मारहाण झाली, पोलिसांच्या हे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी मध्यस्ती करत, त्या माणसाला सोडवलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.