मुंबई : वांद्रे मधल्या नॅशनल हेराल्डला दिलेले भूखंड प्रकरणी गौतम चटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
नॅशनल हेराल्डला वांद्रेतील जो भूंखड दिला होता त्यामध्ये नियम आणि अटींचे उल्लंघन झाले आहे, असे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी समिती नेमली आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि महासचिव राहुल गांधी यांना न्यायालयात खेचण्यात आले होते. त्यामुळे काँग्रेसने रस्त्यावर उतरुण आंदोलन केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती नेमल्याने काँग्रेस आक्रमक पवित्र्यात आहे.