रमेश कदम समर्थकांसह भाजपमध्ये, मुख्यमंत्र्याच्या उपस्थित प्रवेश

चिपळूणमधील राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांनी आज आपल्यासमर्थकांसह भाजपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 2, 2017, 09:44 PM IST
रमेश कदम समर्थकांसह भाजपमध्ये, मुख्यमंत्र्याच्या उपस्थित प्रवेश title=
मुंबईत वर्षा निवासस्थानी रमेश कदम यांचे स्वागत करताना मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : चिपळूणमधील राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांनी आज आपल्यासमर्थकांसह भाजपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. 

यावेळी माज़ी आमदार विनय नातू, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळ माने, तालुकाध्यक्ष रामदास राणे, उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने, नगरसेविका रसिका देवळेकर, नूपुर बाचिम आदी उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक राजू कदम, रमेश खळे, अमजद पटेल,रतन पवार, अमृत कालेकर, लियाकत काद्री, महमद फकीर, हिंदूराव पवार, मिलिंद शिंदे, वासुदेव मिस्त्री, मुराद अडरेकर, उत्तम जाधव, स्नेहा जाधव, मानसी कदम, शौकत परकार, विनोद शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. 

रमेश कदम यांनी राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. महिन्यापूर्वी नगरपरिषद निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी सोडण्याची घोषणा रमेश कदम यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी योग्यवेळी भूमिका जाहीर करण्याचे घोषित केली होती.