मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंविरुद्ध सिंचन प्रकल्पातल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची खुली चौकशी करण्याची परवानगी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने राज्य सरकारकडे मागितली आहे.
राज्यातल्या 12 सिंचन प्रकल्पांची कंत्राटं देताना पक्षपात करुन या दोन नेत्यांनी भ्रष्टाचार केल्याची तक्रार समाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे केलीय. या प्रकरणी अजित पवार, तटकरे तसंच संबंधितांची चौकशी करण्याची परवानगी एसीबीनं राज्य सरकारकडे मागितलीय.
दरम्यान, हे जुन्या बाटलीतील नवं पेय आहे. आणि मी याकडे दुर्लक्ष करतो अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिलीय. तर सरकारला परवानगी द्यावीच लागेल, अशी प्रतिक्रिया विनोद तावडे यांनी दिलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.