काँग्रेसमध्ये विलिन होणे अशक्य – सुप्रिया सुळे

काँग्रेस पक्षाने पवारसाहेब, तारीकसाहेब आणि संगमा साहेबांना पक्षातून काढले ते बाहेर गेले नव्हते. तुम्हांला तुमच्या घरातून काढले आणि मोठ्या भावाला तुमची आठवण येत असेल तर ते छोट्या भावाला बरे वाटते. पण पुन्हा काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विलीन होणे शक्य नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी झी २४ तासच्या खास कार्यक्रमात सांगितले. 

Updated: Sep 23, 2014, 10:04 PM IST
काँग्रेसमध्ये विलिन होणे अशक्य – सुप्रिया सुळे  title=

मुंबई : काँग्रेस पक्षाने पवारसाहेब, तारीकसाहेब आणि संगमा साहेबांना पक्षातून काढले ते बाहेर गेले नव्हते. तुम्हांला तुमच्या घरातून काढले आणि मोठ्या भावाला तुमची आठवण येत असेल तर ते छोट्या भावाला बरे वाटते. पण पुन्हा काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विलीन होणे शक्य नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी झी २४ तासच्या खास कार्यक्रमात सांगितले. 

झी २४ तासवरील रोखठोक सुप्रिया सुळे या कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांनी अनेक प्रश्नांवर दिलखुलास उत्तरे दिली. त्यांना विचारले की राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलिन व्हा असा नेहमी प्रस्ताव दिला जातो. ते तुम्हांला आव्हान वाटते का?  त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुम्हांला का वाटते हे आवाहन आहे. पवार साहेबांना काढून आपण चूक केली हे काँग्रेसच्या लक्षात आले आहे, त्यामुळे ते पुन्हा पुन्हा पवार साहेबांना काँग्रेसमध्ये विलिन होण्याचा प्रस्ताव देत आहेत. त्यांना वाटते की पवार साहेब काँग्रेसमध्ये आले तर काँग्रेसची ताकद वाढेल, त्यामुळे ते नेहमी असे प्रस्ताव देतात. 

या संदर्भात काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग भेटतात तेव्हा म्हणतात, तुम्ही परत आले पाहिजे. हे ऐकल्यावर मला बरे वाटते. घरात भांडण झाली आणि छोटा भाऊ वेगळा झाला. तेव्हा मोठा भाऊ छोट्या भावाला पुन्हा घरी बोलत असेल पण छोटा भाऊ त्याला सांगतो की आता माझा छोटाचा संसार थाटला आहे, त्यात मी खूश आहे. मोठा भाऊ वारंवार आठवण काढतो यातच लहान भावाला समाधान असते असे सांगून विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्ण  विराम दिला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.