अपडेट : 'महायुती'ची बैठक; आठवले पडले बाहेर

महाराष्ट्रात मजबुत युती कायम राहील. जागावाटपाच्या नव्या प्रस्तावावर महायुतीतील घटक पक्षांशी चर्चा करून मंगळवारी संध्याकाळी अधिकृत घोषणा केली जाईल...

Updated: Sep 24, 2014, 12:05 AM IST
अपडेट : 'महायुती'ची बैठक; आठवले पडले बाहेर title=
पत्रकार परिषदेत संजय राऊत आणि विनोद तावडे एकत्र

रात्री 11.00 वाजता

- महायुतीची बैठक सुरूच

- आरपीआय नेते रामदास आठवले बैठकीतून बाहेर पडले

- भोजनासाठी नेते बैठकीतून बाहेर पडल्याचं सांगत सुधीर मुनगंटीवारांची सारवासारव 

रात्री 10.26 वाजता

- घटक पक्ष समाधानी नाही तर आम्हीही समाधानी नाही - भाजप

- शिवसेनेचा नवा फॉर्म्युला घटक पक्षांना अमान्य

-  155, 126, 12 चा फॉर्म्युला घटक पक्षांनी फेटाळला 

सायं ७.४४ वाजता

- वांद्र्याच्या सोफीटेल हॉटेलमध्ये होणार महायुतीची बैठक

- शिवसेना नेते बैठकीला पोहचले.

- घटक पक्षांच्या जागा वाटपावर होणार चर्चा

- रामदास आठवले, सुमंत गायकवाड उपस्थित

- थोड्या वेळात महायुतीची बैठक 

- दिवाकर रावते, संजय राऊत पोहचले

- मिलींद नार्वेकर, अनिल देसाई बैठकीच्या ठिकाणी पोहचले. 

 

दुपारी 5.17 वाजता

* सात जागा दिल्या नाही तर वेगळा विचार करू - जानकर

* महायुतीतील मित्रपत्रांनना सन्मानजनक जागा देण्याचा प्रयत्न करू - मुनगंटीवार 

 

दुपारी 1.45 वाजता
* मित्रपक्षांची अवहेलना सहन करणार नाही - भाजप
* मित्रपक्षांच्या जागा कमी करण्याचा फॉर्म्युला भाजपला अमान्य
* युती टिकावी हिच आमची इच्छा - जानकर
* सेना-भाजप बैठकीतील सूर युतीविरोधात
* पंकजा मुंडे आणि उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार

* नवीन फॉर्म्युल्यांचा गोंधळ - 
  शिवसेना - 150,  भाजप - 126, मित्रपक्ष - 12 की,
  शिवसेना - 150, भाजप - 124, मित्रपक्ष - 14

दुपारी १.२० वाजता
भाजपचे विनोद तावडे , शिवसेनेचे संजय राऊत यांनी भूमिका केली स्पष्ट
दोन्हा पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद

दुपारी १.१६ वाजता
महायुती कायम राहणार, शिवसेना-भाजप हे दोन्ही पक्ष निर्णयावर ठाम

मुंबई : युती होण्याबाबत शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षात एकमत झाले आहे. महाराष्ट्रात मजबुत युती कायम राहील. जागावाटपाच्या नव्या प्रस्तावावर महायुतीतील घटक पक्षांशी चर्चा करून मंगळवारी संध्याकाळी अधिकृत घोषणा केली जाईल, असे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत मंगळवारी सांगितले. ही माहिती संयुक्त पत्रकार परिषदेत भाजप नेते विनोद तावडे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली. 

युती टिकवण्यासाठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून पुन्हा एकदा प्रयत्न झाले. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई, अनिल देसाई या नेत्यांनी भाजपच्या प्रदेश कार्यालयात जाऊन भाजपच्या नेत्यांशी चर्चा केली. भाजपचे महाराष्ट्र प्रभारी ओम माथूर, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, विनोद तावडे, आशिष शेलार या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर संजय राऊत आणि विनोद तावडे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

काँग्रेस-राष्ट्रवादी यांना पराभूत करण्यासाठी आमचा इरादा आहे. आमची युती आहे. सलग २५ वर्षांची युती तुटावी असे दोन्ही पक्षांच्या नेत्यांना वाटत नाही. नविन फॉर्म्युलावर चर्चा होणार आहे. राजू शेट्टी, विनायक मेटे, महादेव जानकर, रामदास आठवले या चार नेत्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. बैठकीत कोणत्या नव्या प्रस्तावावर चर्चा झाली, हे त्यांनी सांगण्यास नकार दिला. शिवसेनेकडून नवा प्रस्ताव आला असून, तो अंतिम ठरविण्याआधी मित्रपक्षांशी आम्हाला बोलावे लागेल. त्यांच्याशी बोलल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी याबाबत अंतिम घोषणा केली जाईल, असे विनोद तावडे यांनी सांगितले.  

दरम्यान, आमच्या सूत्रानुसार मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेने नवा फॉर्म्युला भाजपसमोर ठेवला आहे. त्यानुसार सेना-भाजप नेत्यांमध्ये चर्चा झाली. नविन फॉर्म्युलानुसार शिवसेना - १५१, भाजप -१२४ आणि घटक पक्ष -१३ असे जागांचे वाटप होण्याचे शक्यता आहे.

सकाळी ११.४०
शिवसेना नेते भाजप कार्यालयात
सुभाष देसाई, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर उपस्थित 

सकाळी ९.३० वाजता

शिवसेना-भाजप युतीतील बोलणी पुन्हा सुरु होणार
शिवसेना नेते भाजप नेत्यांच्या भेटीला
युती टिकविण्याबाबत शेवटचे प्रयत्न
वसंत स्मृतीवर भाजपची बैठक 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.