भुजबळांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली आहे.

Updated: Mar 14, 2016, 10:34 PM IST
भुजबळांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया title=

मुंबई: महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकारवर टीका केली आहे. 

सरकार हे सुडबुद्धीनं कारवाई करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. तर सरकारचं हे राजकारण आहे, चौकशीला सहकार्य करत असतानाही भुजबळांना अटक का करण्यात आली असा सवाल राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.