रंग नवरात्रीचे... पाहा, आजच्या दिवसाचा रंग कोणता!

स्त्रियांसोबत पुरुषही या रंगांच्या उधळणीमध्ये मागे न राहता सहभागी होतात... प्रत्येक दिवसाचा एक रंग... होय, ना...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 5, 2013, 12:21 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आजपासून नवरात्रीला सुरुवात होतेय... आज घराघरांत घटस्थापना केली जाईल. सोबतच स्त्रियांसाठी हा सण एक वेगळंच महत्त्व राखतो. कारण, या दिवसापासून सुरू होते रंगांची उधळण... स्त्रियांसोबत पुरुषही या रंगांच्या उधळणीमध्ये मागे न राहता सहभागी होतात... प्रत्येक दिवसाचा एक रंग... होय, ना... अर्थातच, यामागे काही शास्त्रीय कारण नसलं तरी हे रंग जाणून घेण्यासाठी तुम्हीही उत्सुक असाल...
तुम्हीही या रंगांच्या सोहळ्यात सहभागी होत असाल तर एकाच रंगात न्हाऊन तुमच्या ग्रुपचा फोटो आम्हाला जरूर पाठवा... तुमचा फोटो आम्हाला मेल करा... zee24taasonline@gmail.com याईमेल आयडीवर
चला तर पाहुयात... आजच्या दिवसाचा रंग कोणता ते...