www.24taas.com, मुंबई
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा ब्रँड अँम्बेसिडरचा शोध थांबल्यात जमा आहे. माधुरी दीक्षितच्या अटी, सचिन तेंडुलकरचा थंडा प्रतिसाद आणि इतर सेलिब्रेटींच्या विविध कारणांमुळं पर्यटन स्थळ स्वतःच ब्रँड अम्बेसिडर असल्याचं म्हणायची वेळ पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांच्यावर आलीय....
या जाहिरातीमध्ये बिग बी अमिताभ बच्चन गुजरातचे गोडवे गातायत... जाहिरातीच्या माध्यमातून गुजरातने केलेल्या प्रगतीची आणि पर्यटनाची माहिती ते प्रेक्षकांपर्यंत पोहचवतायत... तर मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमीर खान केंद्रीय पर्यटन विकास मंत्रालयाचा इन्क्रेडिबल इंडियाचा चेहरा असणार आहे.. किंग खानही पश्चिम बंगालचा ब्रँड अँम्बेसिडर बनणार असल्याच्या चर्चा आहेत...
महाराष्ट्र पर्यटनचा ब्रँड अँम्बेसिडर होण्यासाठी राज्य सरकारनं विविध सेलिब्रेटीना पायघड्या घातल्या.. मात्र विविध कारणांमुळं त्यांच्याकडून नकारघंटा मिळाली.. सरकारकडून सगळ्यात आधी विनंती झाली ती म-हाठमोळ्या धकधकगर्ल माधुरीला.. मात्र तिनं घातलेल्या जाचक अटींमुळं सरकारची पंचाईत झाली.. यासाठी ती वर्षातून तीन दिवस देणार होती.. शिवाय नऊ कोटी रुपये मानधन आणि अकादमीसाठी चौदा एकर जमीन तिला सरकारकडून फुकटात हवी होती. मात्र या अटींमुळंच कराराआधीच डाव मोडला.. त्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही सरकारनं विनंती केली.. अद्याप सचिनकडून सरकारच्या पत्राला उत्तर मिळालं नाही.
अभिनेता हृतिक रोशनच्याही नावाचा विचार सरकारकडून झाला... मात्र तारखांच्या घोळांमुळं हा प्रस्ताव बारगळला.. अखेर दबंग खान सलमानच्या नावाचा पर्याय विचार घेण्यात आला.. मात्र टायगर सल्लुमियाँच्या नावावर असलेल्या गंभीर गुन्ह्यांमुळं त्यांच्या नावावरही फुल्ली बसली.. आमीरच्या नावाचीही चर्चा झाली.. अखेर ती चर्चाच राहिली.. त्यामुळं अखेरीस राज्यातली सर्व पर्यटनस्थळं स्वतःच ब्रँड अँम्बेसिडर असल्याचं सांगण्याची वेळ पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्यावर आलीय..
या विधानामुळं राज्यात पर्यटन ब्रँड अँम्बेसिडरचा शोध थांबल्याचे सूचक विधानच भुजबळांनी केलंय.. मात्र अनेक दिग्गज व्यक्ती घडवणा-या महाराष्ट्राच्या पर्यटनासाठी ब्रँड अँम्बेसिडर मिळू नये याहून दुर्देवाची गोष्ट ती कोणती...