मुंबई : मुंबई आणि महाराष्ट्रात पुढील काही दिवस लोकांना घामाघूम व्हावं लागणार आहे. ऑक्टोबर हिट सुरू झाली असून मुंबईसह इतर जिल्ह्यात कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे.
पश्चिम किनारपट्टीजवळ द्रोणीय परिस्थिती निर्माण झालीय. त्यामुळं मुंबईत धुसर वातावरण निर्माण झालंय. येत्या दोन दिवसात धुसर वातावरणात बदल होत कमाल तापमानात वाढ होईल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तविला आहे.