मुंबई : ओला आणि उबर टॅक्सीविरोधात जय भगवान टँक्सी आणि रिक्षा महासंघाने 29 ऑगस्टपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे.
मुंबई आणि ठाण्यातल्या 70 ते 80 हजार टॅक्सी आणि रिक्षा रस्त्यावर उतरणार नाहीत, असं महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारने ओला, उबर या अॅप आधारित टॅक्सी सेवांवर नियंत्रण आणण्यासाठी पावले उचलण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन पाळले नसल्याचे सांगत सोमवारपासून बेमुदत संप पुकारण्यात आला.