ओवेसी, नारायण राणे, शरद पवारांवर उद्धव ठाकरेंची सडकून टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वांद्र्यातल्या प्रचारसभेत नारायण राणे, शरद पवार आणि MIM नेते ओवेसी बंधू यांच्यावर सडकून टीका केली. हैदराबादचे आव्हान स्वीकारायला हैदराबाद काय ओवेसीच्या बापाचे आहे काय? अशा ठाकरी शैलीत उद्धवनी ओवेसी बंधूंचा समाचार घेतला.

Updated: Apr 9, 2015, 09:34 AM IST
ओवेसी, नारायण राणे, शरद पवारांवर उद्धव ठाकरेंची सडकून टीका title=

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वांद्र्यातल्या प्रचारसभेत नारायण राणे, शरद पवार आणि MIM नेते ओवेसी बंधू यांच्यावर सडकून टीका केली. हैदराबादचे आव्हान स्वीकारायला हैदराबाद काय ओवेसीच्या बापाचे आहे काय? अशा ठाकरी शैलीत उद्धवनी ओवेसी बंधूंचा समाचार घेतला.

एमआयएमचा ओवेसी भुंकतोय. भूक भूक भुंकतोय. हैदराबादला येऊन दाखवा म्हणतोय. अरे, हैदराबाद काय तुझ्या बापाचे आहे काय? ते भारतात आहे हे लक्षात ठेव. अंगावर आलास तर शिंगावर तर घेऊच! पण आता गोवंश हत्याबंदीमुळे इतकी शिंगे आहेत की तुझ्या कुठे-कुठे घुसतील कळणारच नाही, असे सडेतोड उत्तर उद्धव यांनी दिले. 

जहरी भाषणं करून घरं पेटवण्यापेक्षा गरीब मुस्लिमांच्या घरातली चूल आधी पेटव, असा टोला त्यांनी ओवेसींना लगावला. कोकणी जनतेनं नारायण राणेला गाडला. तरीही तो मातोश्रीवर चाल करून आलाय. त्याला पराभूत करून भगवा फडकवा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी तमाम शिवसैनिकांना केलं.

यावेळी उद्धव यांनी शरद पवारांवर तोंडसुख घेतले. शरद पवार हे कुडमुडे ज्योतिषी आहे. सरकार पडण्याची वाट पाहात बसलेत, अशा शब्दांत त्यांनी पवारांवर हल्ला चढवला. पवारांनी उद्धव यांच्यावर टीका केली होती. नवी पिढीला किती समजते, असे म्हटले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.