मुंबई : धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्याचं आश्वासन देतांना पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. 'माझा बाप असता, तर सगळेच मिळाले असते. वेळ लागत असला, तरीही भाजपच्या सत्तेमधूनच धनगर समाजाला आरक्षण मिळणार’, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
आहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त 'रासप'ने मंगळवारी आझाद मैदानात घेतलेल्या मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होत्या.
'गोपीनाथ मुंडे असते, तर धनगरांना आरक्षण मागवण्याची वेळ आली नसती', अशा घोषणा कार्यक्रमात कार्यकर्ता रावसाहेब वाकसे यांनी दिल्या. यावेळी रासपच्या मेळाव्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे बोलत होते.
तसेच वाकसे यांना भाषण करण्याची संधी दिली नाही, म्हणून त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासा रासपने केला आहे. दानवेंचं अध्यक्षीय भाषणास संपल्यानंतर, पंकजा मुंडे यांनी भाषण केलं, यात त्यांनी वाकसे यांच्यासह अनेकांना चिमटे काढले.