भुजबळांच्या संपत्तीचं मोजमाप संपता संपेना, पवार-तटकरेंची खडसेंकडे धाव

 सुनील तटकरे आणि अजित पवारांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतल्याची माहिती मिळतेय. समीर भुजबळ यांच्या अटकेनंतर भेट झाल्याने राजकीय वर्तुळात याबद्दल अनेक तर्क-वितर्कांना ऊत आलाय. ही भेट महानंदा संदर्भात घेतल्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येतेय. 

Updated: Feb 3, 2016, 10:24 PM IST
भुजबळांच्या संपत्तीचं मोजमाप संपता संपेना, पवार-तटकरेंची खडसेंकडे धाव title=

मुंबई : सुनील तटकरे आणि अजित पवारांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतल्याची माहिती मिळतेय. समीर भुजबळ यांच्या अटकेनंतर भेट झाल्याने राजकीय वर्तुळात याबद्दल अनेक तर्क-वितर्कांना ऊत आलाय. ही भेट महानंदा संदर्भात घेतल्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येतेय. 

भुजबळांच्या संपत्तीची मोजणी संपता संपेना

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी ईडीनं छगन भुजबळांच्या विविध संपत्तींवर छापे मारले होते. या छाप्यात कोट्यवधी रुपये अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच 'ईडी'ला मिळालेत.

ही रक्कम इतकी प्रचंड आहे की दोन दिवसांपासून पैसे मोजण्याचं काम सुरू आहे. त्यामुळं या संपत्तीचा नेमका आकडा अजूनही समोर येत नाहीए. 

लवकरच ईडी याबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. भुजबळ आणि कुटुंबीयांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात दोन दिवसांपूर्वी ईडीनं हे छापे मारले होते.