महाराष्ट्रात मॅगीवरील बंदी कायम

महाराष्ट्रात मॅगीवरील बंदी कायम असणार आहे. मॅगी आरोग्याला घातक असल्याचा सरकारी अहवाल जाहीर झाला. तसेच अन्य राज्यातही मॅगीवर बंदी घातल्यात आली आहे.

Updated: Jun 13, 2015, 12:02 PM IST
महाराष्ट्रात मॅगीवरील बंदी कायम  title=

मुंबई : महाराष्ट्रात मॅगीवरील बंदी कायम असणार आहे. मॅगी आरोग्याला घातक असल्याचा सरकारी अहवाल जाहीर झाला. तसेच अन्य राज्यातही मॅगीवर बंदी घातल्यात आली आहे.

मॅगी बंदी हटवण्याच्या मागणीसाठी नेस्ले इंडियानं मुंबई हायकोर्टात धाव घेतलीय. मात्र हायकोर्टानं नेस्लेला दिलासा देण्यास शुक्रवारी नकार दिला. त्यामुळं बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी यापुढंही सुरूच राहणार आहे.

मॅगी बंदी प्रकरणी उत्तर देण्यासाठी FSSAI या केंद्र सरकारी संस्थेला दोन आठवड्यांची मुदत देण्यात आलीय. याप्रकरणी पुढील सुनावणी ३० जूनला होणार आहे. मॅगीत आरोग्याला घातक असणारे पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मॅगीने भारतातील आपला माल माघारी घेण्याचे जाहीर केले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.