मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भुजबळांची शैक्षणिक कागदपत्रं बनावट असल्याची तक्रार चेंबूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
भुजबळांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. भुजबळांच्या विरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झालीय. खोटी कागदपत्रे सादर केल्याबद्दल संजीव खांडेकर यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
भुजबळांची शैक्षणिक कागदपत्रे खोटी असल्याचा दावा तक्रारदारानं केलाय. दरम्यान, भाजपचे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्यानंतर आता भुजबळांच्या शिक्षणाचा वाद सुरू झालाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.