मुंबई : पेट्रोलपंप मालकांनी उद्याचा प्रस्तावित संप, तूर्तास न करण्याचा निर्णय महाराष्ट्र डिलर असोसिएशननेघेतला आहे. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते विनोद तावडे यांच्या मध्यस्थीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
‘एक राज्य एक कर' या करप्रणालीसाठी मुंबई वगळता राज्यभरातले सर्व पेट्रोलपंप मालक उद्यापासून बेमुदत संपावर जाणार होते. प्रस्तावित 26 ऑगस्टचा संप स्थगित करत असल्याची घोषणा असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांनी आज केली.
मात्र असं असलं तरी आजपासूनच बहुतांश पेट्रोलपंपचालकांनी अघोषितपणे संप पुकारल्याचं चित्र पाहायला मिळतं होतं.
त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जाव लागलं.शिवाय अनेकांनी खबरादारी म्हणून जास्तीचं पेट्रोल-डिझेल भरुन घेत होते. त्यामुळे अनेक पेट्रोलपंपही कोरडेठाक पडले. म्हणून आज नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी आणि नागपूरसह अनेक ठिकाणी पेट्रोलसाठी ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. देशात एलबीटी आणि जकात फक्त महाराष्ट्रातच आकारले जातात.
ज्याचा फटका म्हणून ग्राहकांना लिटरमागे 5 ते 6 रुपये जादा मोजावे लागत आहेत. त्यामुळे हे कर रद्द तातडीनं रद्द होऊन राज्यभरात एकच करप्रणाली आणली जावी, अशी मागणी फेड्रेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर असोसिएशननं केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.