'पोकिमॉन गो'च्या कंपनीच्या सीईओंचं ट्विटर अकाऊण्ट हॅक

'पोकिमॉन गो' या मोबाईल गेमच्या पॅरेंट कंपनीच्या सीईओचं ट्विटर अकाऊण्ट हॅक करण्यात आलं आहे.  तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांचे अकाऊण्ट हॅक होण्याचा प्रकार वाढले आहेत.

Updated: Aug 1, 2016, 10:52 PM IST
'पोकिमॉन गो'च्या कंपनीच्या सीईओंचं ट्विटर अकाऊण्ट हॅक title=

मुंबई : 'पोकिमॉन गो' या मोबाईल गेमच्या पॅरेंट कंपनीच्या सीईओचं ट्विटर अकाऊण्ट हॅक करण्यात आलं आहे.  तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांचे अकाऊण्ट हॅक होण्याचा प्रकार वाढले आहेत.

अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींची सोशल मीडिया अकाऊण्ट हॅक करणाऱ्या 'अवरमाईन' (OurMine) या ग्रुपनेच हँक यांचं अकाऊण्ट हॅक केल्याचा दावा केला जात आहे.
 
यापूर्वी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांच्या ट्विटर अकाऊण्टवरही हॅकर्सची वक्रदृष्टी होती. त्यानंतर आता रिअॅलिटी मोबाईल गेम पोकिमॉन गोच्या पॅरेंट कंपनीचे सीईओ जॉन हँक यांचा नंबर लागला आहे.

सुरक्षा तपासण्याच्या उद्देशाने आम्ही हे अकाऊण्ट हॅक केल्याचं तथाकथित अवरमाईन ग्रुपने म्हटलं आहे या अकाऊण्टच्या ट्विटर अकाऊण्टवरुन अनेक ट्वीट्स केली जात आहेत. 

नेहमीप्रमाणेच अवरमाईनने हॅकिंगची जबाबदारी स्वीकारली आहे. एका ट्वीटमध्ये हँक यांचा पासवर्ड nopass असल्याचं म्हटलं आहे. हा पासवर्ड  सोपा असल्याचंही या  लिहिलं आहे.  सिक्युरिटी अपग्रेड करण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या, असंही हॅकर्सनी म्हटलं आहे.