www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आता पोलिसांचे पगार अॅक्सिस बँकेत नाही तर स्टेट बँकेत जमा होणार आहेत. अॅक्सिस बँकेतून काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या पगाराचीच रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणाचा चांगलाच धसका पोलिसांनी घेतलाय.
काही पोलिसांचच अकाऊंट हॅक करून पगाराची रक्कम काढण्यात आल्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी अॅक्सिस बँकेत यापुढे कर्मचार्यांनचे पगार जमा न करण्याचा निर्णय घेतलाय. पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांच्या आदेशानुसार पोलिसांचे पगार आता स्टेट बँक ऑफ इंडियात जमा होणार आहेत.
सायबर भामट्यांचा फटका १४ जून रोजी मुंबई पोलिसांना बसला. मुंबई पोलीस दलातील १३ कर्मचाऱ्यांचे अकाऊंट हॅक करून भामट्यांनी रोकड लांबविण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. भामट्यांनी ऍक्सिस बँकेतील एकूण २९ अकाऊंट हॅक केल्याचे निष्पन्न झाले होते. या घटनेमुळे महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.
पुणे या आदेशाची अमंलबजावणीही केलीय. पोलिसांनी यापुढील काळात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे पगार अॅक्सिस बँकेत जमा न करण्याचा निर्णय घेतला. गेली पाच वर्षे अॅक्सिस बँकेत कर्मचाऱ्यांचे पगार जमा होत होते. नवीन आदेशानुसार पोलिसांचे पगार आता स्टेट बँक ऑफ इंडियात जमा होणार आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.