गणेशोत्सवासाठी ३५ हजार पोलीस तैनात; पोलीस आयुक्तही रस्त्यावर

जगात गणेशोत्सवाची सर्वात जास्त धूम दिसते ती मायानगरी मुंबईमध्ये... त्यामुळे याकाळात भाविकांच्या सुरक्षेची मोठी जबाबदारीही मुंबई पोलिसांवर असते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुंबई पोलिसांनी भाविकांच्या सुरक्षेकरता चोख सुरक्षेचा बंदोबस्त केलाय. 

Updated: Sep 19, 2015, 06:58 PM IST
गणेशोत्सवासाठी ३५ हजार पोलीस तैनात; पोलीस आयुक्तही रस्त्यावर title=

मुंबई : जगात गणेशोत्सवाची सर्वात जास्त धूम दिसते ती मायानगरी मुंबईमध्ये... त्यामुळे याकाळात भाविकांच्या सुरक्षेची मोठी जबाबदारीही मुंबई पोलिसांवर असते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुंबई पोलिसांनी भाविकांच्या सुरक्षेकरता चोख सुरक्षेचा बंदोबस्त केलाय. 

भाविकांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी, रस्त्यारस्त्यांवर पोलीस तैनात दिसत आहेत. विशेष म्हणजे, हा बंदोबस्त योग्य पद्धतीनं होतोय किंवा नाही याची चाचपणी करण्यासाठी स्वत: पोलीस आयुक्त अहमद जावेद अनेक ठिकाणी सरप्राईज व्हिजिट देणार आहेत. 

५ सहपोलीस आयुक्त, ९ अप्पर पोलीस आयुक्त, ३५ डीसीपी, ७४ एसीपी असा मोठा ताफा गणेशोत्सवाच्या काळात तैनात असणार आहे. हे मुंबई पोलीस दलातील मोठे अधिकारी गणेशोत्सवाच्या काळाच सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईतील गल्ली बोळात फिरताना दिसणार आहेत.

याशिवाय मुंबईतल्या मोठ्या मंडळांच्या गणपती दर्शनाकरता येणाऱ्या भक्तांच्या सुरक्षेकरता आणि विसर्जन दिवशी ३५ हजार पोलीस, ९३ महिला छेडछाड पथक, हरवलेल्या मुलांच्या शोधाकरता विशेष पथक, २ आयटीबीपी, १० राज्य राखीव दल, ५०० होमगार्ड, ५५०० स्वयंमसेवी संस्थांचे स्वयंसेवक, ५५० लाईफगार्ड, ५ ड्रोन, रॅपिड एक्शन फोर्स यांची मदत घेवून मुंबईत ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. 

त्यामुळे मुंबईत येणाऱ्या भाविकांना यंदाही सुरक्षेची काळजी वाटणार नाही, असं मुंबई पोलीस प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.