www.24taas.com, ठाणे
मध्य रेल्वेच्या मार्गावर आज सकाळी पुन्हा एकदा वाहतूकीचा खोळंबा झालाय. ठाणे स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय.
मध्य रेल्वेच्या ठाणे स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं मुंबईकडे येणाऱ्या फास्ट लोकल धिम्या गतीनं चालवण्यात येत आहे. गाड्या तब्बल २० ते २५ मिनिटांनी उशीरा धावत आहेत. त्यामुळे शनिवारी सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांना आणि विद्यार्थ्यांना चांगलाच फटका बसलाय. अनेक प्रवाशांनी पायपीट करत जवळचे स्टेशन गाठल्याची माहिती मिळतेय.
दरम्यान, रेल्वे कर्मचाऱ्यांनी सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक बिघाड दुरूस्त केला असून हळूहळू रेल्वे वाहतूक पूर्व पदावर येऊ लागल्याची माहिती मिळतेय.