www.24taas.com, मुंबई
गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या वरुणराजानं मुंबईत दमदार कमबॅक केलंय. रात्रीपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे.
रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळं मुंबईतल्या कुलाबा, माटुंगा, सायन या भागांतही पाणी साचलंय. पावसामुळे सायन स्टेशनजवळ ट्रॅकवर पाणी साचलंय. त्यामुळे मध्यरेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटं उशिरा सुरू आहे. पावसानं केवळ मुंबईतच नव्हे तर ठाणे, नवी मुंबईतही जोरदार हजेरी लावलीय.
आज रविवार म्हणजेच सुट्टीच्या दिवशी पावसानं हजेरी लावल्यानं मुंबईकरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पावसाच्या पुनरागमनामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळालाय.