मुंबईत पावसाची संततधार

मुंबईत काल संध्याकाळी सुरु झालेल्या पावसानं रात्रभर शहर आणि उपनगरांना झोडपून काढलंय. सकाळी साडे पाच वाजेपर्यंत दक्षिण मुंबईत 39.29 मिलीमीटर पावसाची नोंद झालीय.

Updated: Jul 29, 2016, 07:58 AM IST
मुंबईत पावसाची संततधार title=

मुंबई : मुंबईत काल संध्याकाळी सुरु झालेल्या पावसानं रात्रभर शहर आणि उपनगरांना झोडपून काढलंय. सकाळी साडे पाच वाजेपर्यंत दक्षिण मुंबईत 39.29 मिलीमीटर पावसाची नोंद झालीय.

पूर्व आणि पश्चिम उपनगरातही पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे वाहतूकीवर तूर्तास परिणाम झालेला नाही. पण पश्चिम उपनगरातल्या जोगेश्वेरी, अंधेरी, विलेपार्ले भागात जोरदार पावसानं सखल भागात पाणी साठायला सुरूवात झालीय.  

पूर्व उपनगरात विशेषः विक्रोळी ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूरात संध्याकाळपासूनचं पावसानं जोर धरलाय. अद्यापही पावसाची संततधार कायम आहे. पश्चिम उपनगरात आज सकाळी साडे पाच वाजेपर्यंत 50 मिलीमीटर तर पूर्व उपनगरात 39.39 मिलीमीटर पर्जन्यमान नोंदवण्यात आलंय.