निश्चिंत राहा पाऊस येणार

भारतीय हवामान खात्याच्या ‘दीर्घ मुदत अंदाज’ विभागाचे हवामानशास्त्रज्ञ आणि संचालक डॉ. डी. एस. पै. यांनी प्रहार या दैनिकाला पाऊस आणि हवामान यावर दिलेल्या मुलाखतीत पावसाविषयी खालील मुद्दे मांडले आहेत. 

Updated: Jun 29, 2014, 09:12 PM IST
निश्चिंत राहा पाऊस येणार title=

मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या ‘दीर्घ मुदत अंदाज’ विभागाचे हवामानशास्त्रज्ञ आणि संचालक डॉ. डी. एस. पै. यांनी प्रहार या दैनिकाला पाऊस आणि हवामान यावर दिलेल्या मुलाखतीत पावसाविषयी खालील मुद्दे मांडले आहेत. 

1) कमी पावसामुळे सगळेच चिंताचूर आहेत, पण पाऊस नक्की कोसळणार. यंदा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडयात पावसाला सुरुवात होईल. त्यामुळे निश्चिंत राहा..

2) भारतीय हवामान खात्याचा अंदाज जगभरातील हवामान खात्यांकडून प्रशंसेला पात्र ठरला आहे. हवामानाच्या अंदाजांचे महत्त्व आता आपल्याकडेही पटू लागले आहे. 

3) भारतीय हवामान खात्याचे अंदाज गेल्या काही वर्षापासून अचूक ठरत आहेत. फियान वादळ असो, वा गेल्या वर्षातील थडकणारी वादळे, याबाबत भारतीय हवामान खात्याकडून अगोदरच अलर्ट करण्यात आले होते.

4) जागतिक तापमानवाढीमुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढतेय, हे खरे आहे. पण एल-निनो हा समुद्रातील घटक आहे, जो नैसर्गिक आहे. 

5) महासागरात अशा अनेक गोष्टी घडतात. सरसकट जागतिक तापमानवाढ आणि एल-निनोचा संबंध लावू नये.

6) पाण्याच्या नियोजनाचा आणि पावसाच्या कामगिरी यांचा परस्परांशी संबंध नाही. मुळात जून ते सप्टेंबर या काळात पाऊस कमी झाल्यास माणसे पाण्याचे नियोजन करतात, हे चुकीचे आहे. 

7) पाण्याचा अपव्यय टाळणे हे मुळात नियोजनाचा महत्त्वाचा भाग आहे. अचानकपणे पावसाने दडी मारली तो काळ मोठा असला की पाण्याच्या नियोजनाची घाई होते, हे चुकीचे आहे, असंही हवामानशास्त्रज्ञ आणि संचालक डॉ. डी. एस. पै यांनी म्हटलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.