राज ठाकरेंचे पवारांवरील आरोप केवळ प्रसिद्धीसाठी : राष्ट्रवादी

महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेले आरोप निव्वळ प्रसिद्धीसाठी असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलाय.

Updated: Aug 19, 2015, 05:32 PM IST
राज ठाकरेंचे पवारांवरील आरोप केवळ प्रसिद्धीसाठी : राष्ट्रवादी title=

मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेले आरोप निव्वळ प्रसिद्धीसाठी असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलाय.

या विरोधामागे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं साटलोटं असल्याच्या राज यांच्या आरोपालाही तटकरे यांनी उत्तर दिले. भाजपच्या मंत्र्यांची नावं जाहीर करण्याचं आव्हान तटकरेंनी राज यांना दिले आहे. 

दरम्यान, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराविरोधात भूमिका घेणाऱ्या शरद पवारांचा मनसेनं निषेध केलाय. मुंबईत भारतमाता थिएटर चौकात मनसेच्यावतीने आंदोलन करण्यात आलं.

पवारांविरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी आंदोलक मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

तर दुसरीकडे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा मार्ग मोकळा झालाय. बाबासाहेबांना जाहीर झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारविरोधी याचिका हायकोर्टानं फेटाळलीय. बाबासाहेबांच्या कार्याविषयी आणि पुरस्कारविरोधातली याचिका अर्थहीन असल्याचं निरीक्षण यावेळी हायकोर्टानं नोंदवलंय. 

या याचिकेवर हायकोर्टात जवळपास दीड तास गरमागरम युक्तीवाद झाला. ही याचिका केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचा युक्तीवाद महाधिवक्ता अनिल सिंह यांनी केला. ही याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्यांना कोर्टानं दहा हजार रुपयांचा दंड ठोठावलाय कोर्टाचा वेळ वाया घालवल्यानं कोर्टाकडून हा दंड ठोठावण्यात आलाय.

तर दुसरीकडे बाबासाहेब पुरंदरेंना देण्यात येणा-या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या तोंडावर जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी मुंबईत राडा केलाय. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या शासकीय बंगल्यावरील कार्यालयात जिजाऊ ब्रिगेडच्या महिला घुसल्या. या महिलांनी कार्यालयात स्वत:ला कोंडून घेतलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.