मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दोन्ही नेते भेटले. नीट परीक्षेच्या घोळासंदर्भात ही भेट झाली. त्यानंतर दोघांची एकांत गुप्त चर्चा झाली.
गेल्या आठवड्यात नीटच्या अध्यादेशामुळे कुठलाही दिलासा मिळाला नसल्याची तक्रार काही पालकांनी राज ठाकरेंकडे केली होती. या भेटीदरम्यान काही पालकही उपस्थित होते. मात्र ही चर्चा झाल्यानंतर ठाकरे आणि फडणवीस यांनी तब्बल २० मिनिटं एकांतात गुफ्तगू केलं. त्यामुळे राज्यातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही या दोघांनी चर्चा केल्याचं झाल्याचं सांगण्यात येतंय.
दरम्यान, खासगी कॉलेजांना CET लागू नसल्यामुळे केंद्राच्या अध्यादेशाचा काहीच फायदा नसल्याची भावना पालकांनी बोलू दाखवली. यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांच्याशी बोलून तोडगा काढू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.